निवडणूक

खेड पंचायत समिती उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर सदस्य अमर कांबळे विजयी, तर शिवसेनेचे मच्छिंद्र गावडे यांचा पराभव… शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंगला सामना…

खेड पंचायत समिती उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर सदस्य अमर कांबळे विजयी, तर शिवसेनेचे मच्छिंद्र गावडे यांचा पराभव…
शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंगला सामना…

महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीचे उपसभापतीपदाच्या निवडणुकीत पंचायत समितीतील शिवसेनेचे बंडखोर सदस्य अमर एकनाथ कांबळे यांना १२ पैकी १० मते पडल्याने त्यांची उपसभापती म्हणून निवड झाली. कांबळे यांच्या विरोधात शिवसेनेचेच मच्छिंद्र गावडे यांनी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांना फक्त दोन मते पडल्याने पराभव झाला. या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला. शिवसेना व काँग्रेस मिळून दोन पंचायत समिती सदस्य गैरहजर राहिले.

चांगदेव शिवेकर यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त उपभापतीपदासाठी खेड पंचायत समितीच्या राजेशिवछत्रपती सभागृहात निवडणूक झाली. पीठासीन अधिकारी विक्रांत चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक संपन्न झाली. गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी चव्हाण यांना निवडणुकीसाठी मदत केली.

उपसभापतीपदाचे नामनिर्देशनपत्र शिवसेनेचे अमर कांबळे व मच्छिंद्र गावडे यांनी वेळेत दाखल केले. छानणीत अर्ज वैध ठरले आणि कुणीही माघार न घेतल्याने शेवटी निवडणूक घेण्यात आली. १४ पैकी दोन सदस्य गैरहजर राहिल्याने १२ सदस्यांनी मतदान केले. मतमोजणीत कांबळे यांना सर्वाधिक १० तर गावडे यांना फक्त दोन मते पडली. मोठ्या फरकाने कांबळे विजयी झाले. निवडणूक प्रसंगी सभागृहात सभापती अरुण चौधरी, मावळते उपसभापती चांगदेव शिवेकर, पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, ज्योती अरगडे, नंदा सुकाळे, वैशाली जाधव, सुनीता सांडभोर, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नवनिर्वाचित उपसभापती कांबळे, मच्छिन्द्र गावडे असे १२ सदस्य हजर होते. सेनेचे सदस्य व माजी सभापती भगवान पोखरकर अटकेत असल्याने हजर राहिले नाहीत. तर काँग्रेसचे अमोल पवार या निवडणुकीपासून अलिप्त राहिले.

कांबळे यांचा सत्कार :- निवडीनंतर सभागृहात कांबळे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यानंतर पंचायत समितीच्या गेट समोर छोटेखानी सभा झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, माजी जि. प. सदस्य अरुण चांभारे, सभापती अरुण चौधरी, माजी सभापती अंकुश राक्षे, नवनिर्वाचित उपसभापती अमर कांबळे यांसह इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
———————————————————————-
● सर्वांच्या सहकार्याने मला उपसभापतीपदाची संधी मिळाली. सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर राहून आणि सर्वांना विश्वासात घेऊन तालुक्याचा विकास केला जाईल. विकास करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे करणार. 
नवनिर्वाचित उपसभापती अमर कांबळे
————————————————————————
आमचा दहाचा ग्रुप :- उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सेनेचे पाच बंडखोर सदस्य, राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचा एक असा १० जणांचा ग्रुप पंचायत समितीत तयार झाला आहे. हेच १० मतदान कांबळे यांना झाले. भाषणात सर्वांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात विकास सुरू असल्याचे सांगितले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.