महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या खेड व मावळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या ९ व १० तारखेला होणाऱ्या निवडणुका १६ फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्यात आल्या असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. उर्वरित तालुक्यांच्या निवडणुका यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे होणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका ९ व १० तारखेला होणार होत्या, परंतु खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, बिरदवडी, नाणेकरवाडी व मावळ तालुक्यातील परंदवडी या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्या होत्या.
सदर याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी ९ तारखेला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी साठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ९ व १० फेब्रुवारीला होणाऱ्या खेड व मावळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणूक १६ फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवल्या आहेत. हे दोन तालुके वगळून उर्वरित ११ तालुक्यातील निवडणुका यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार ९ व १० तारखेला पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.