खेड तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करावेत-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर: खेड तालुक्यातील कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी  पुण्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी.  संस्थात्मक विलगीकरण, कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांची संपर्क शोध मोहिम यात वाढ करावी असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.
     राजगुरुनगर येेथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी
यांनी बैठक घेतली. यावेळी आमदार दिलीप मोहिते, सभापती अंकुश राक्षे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घ्यावे.  कोणत्याही रुग्णाला परत पाठवू नये. रुग्णाला दाखल करुन घेण्यास खाजगी रुग्णालयानी टाळाटाळ करु नये, अशा स्पष्ट सूचना देत जिल्हाधिकारी राम म्हणाले. कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर, कोविड आरोग्य तपासणी केंद्र वाढवावेत तसेच कन्टेंन्मेंट झोनमधील नागरिकांची प्राधान्याने आरोग्य तपासणी करावी.  कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तिंचा अत्यंत कोटेकोरपणे शोध घेणे आवश्यक आहे. तसेच  संस्थात्मक विलगीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या  सोयीसुविधा दर्जेदार असायला हव्यात. कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी  स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून कोरोनाचे संकट  दूर करु असा विश्वास  व्यक्त केला.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.