महाबुलेटीन न्यूज । नाजीम इनामदार
राजगुरूनगर :- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण खेड तालुका आमदार दिलीप मोहिते पाटील, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले.
खेड घाटाच्या पायथ्याशी झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. या कामाचे खरे श्रेय हे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. मी फक्त कर्तव्य म्हणून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खेडघाटाचे लोकार्पण या शेतकऱ्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानुसार दत्तात्रय कोरडे, देवराम थिगळे, दशरथ थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला आमदार श्री. दिलीपअण्णा मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे, तालुकाध्यक्ष श्री. कैलास सांडभोर, सभापती श्री. विनायक घुमटकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. संध्याताई जाधव, युवती अध्यक्ष आशा तांबे कांचन ढमाले, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, तालुकाध्यक्ष विजय डोळस, दिलीप मेदगे, अरुण चांभारे, बाबा राक्षे, विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर, रामदास ठाकूर, दादा इंगवले, सुभाष होले, नवनाथ होले, अरुण थिगळे, धैर्यशील पानसरे, मनीषा सांडभोर व अन्य पदाधिकारी, तुकाईवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.