महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कोविड -१९ चे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने खेड तालुका आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्याची मागणी पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना केली आहे.
खेड तालुक्यामध्ये १५ मार्च २०२० रोजी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे काम करणारा कर्मचारी कि, ज्याचे वास्तव्य राजगुरूनगर येथे आहे. तो व त्याचे कुटुंबातील इतर ४ सदस्य प्रथमतः कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करून सर्व औषधोपचार पूर्ण करून ते पूर्णतः बरे झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते.
त्यानंतर दि. २५ जून २०२० पर्यंत खेड तालुक्यातील कोरोना पॅझिटिव्ह संख्या हि साधारणतः ५७ एवढी होती. परंतु मागील ७ दिवसांत खेड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या हि जवळपास १२९ एवढी झाली आहे. इतक्या कमी कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ लक्षात घेता तालुक्यात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यात राजगुरूनगर, आळंदी व चाकण नगरपरिषदांचा समावेश होतो. चाकण व म्हाळुंगे येथे औद्योगिक परिसर असून येथील नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी व कडाचीवाडी येथे लोकसंख्येची घनता हि मोठ्या प्रमाणावर आहे. चाकण व म्हाळुंगे येथील औद्योगिक कंपन्यांमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड इतर रेड झोनमधून येणाऱ्या कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे.
तालुक्यात प्रथमतः आढळून आलेले रुग्ण हे पुणे व पिंपरी-चिंचवड व मुंबई सारख्या संक्रमित असलेल्या रेड झोनमधून आलेलं नागरिक होते. परंतु मागील सात आठ दिवसांत आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे स्थानिक असून पुणे व इतर संक्रमित भागातून येणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात चुकीने किंवा अगदी १५ ते २० मिनिटे आले तरी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. हि बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. याबाबत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सर्व पदाधिकारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने व प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खेड तालुका पुढील आठ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.