महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट नेटवर्क सुरळीतपणे मिळावे, यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन जिओ कंपनीने वाशेरे, भोरगिरी, कोयाळी ( देशमुखवाडी ) व चिखलगाव या ठिकाणी मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत.
कोविड – १९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. परंतु ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी भागातील गावांमध्ये इंटरनेट नेटवर्क मिळण्यात सातत्याने अडचणी येत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी जिओ कंपनीशी पत्रव्यवहार करून खेड तालुक्यातील वाशेरे, भोरगिरी, कोयाळी ( देशमुखवाडी ), चिखलगाव, कळमोडी, धामणगाव खु. आणि सुपे येथे मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिओ कंपनीने वाशेरे, भोरगिरी, कोयाळी ( देशमुखवाडी ) व चिखलगाव येथे मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत. तर पाभे येथील जिओच्या टॉवरचे नेटवर्क धामणगाव खु. येथे मिळत असल्याने येथे टॉवर उभारण्याची आवश्यकता नाही. तसेच डोंगराळ परिसरामुळे सुपे आणि कळमोडी येथे टॉवर उभारण्यात अडचणी येत असल्याचे जिओ कंपनीने खासदार डॉ. कोल्हे यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी केलेले प्रयत्न व पाठपुरावा यामुळे वाशेरे, भोरगिरी, कोयाळी ( देशमुखवाडी ) व चिखलगाव येथे जिओ कंपनीचे टॉवर उभे राहणार असल्याने या परिसरातील गावांमध्ये इंटरनेट नेटवर्क सुरळीतपणे मिळणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासात भेडसावणाऱ्या अडचणी दूर होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याबाबत डॉ. कोल्हे म्हणाले की, “खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये विद्यार्थ्यांना इंटरनेट नेटवर्क उपलब्ध व्हावे, यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार जिओ कंपनीचे टॉवर उपलब्ध करून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करू.”
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.