महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील वाघजाईनगरच्या हद्दीत दुचाकीहून जाणाऱ्या तरुणाच्या अंगावर विजवाहक तार तुटून पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणाचे नाव विशाल बर्मा ( वय २०, रा. हुकूम, सामी, जि. जालोन, उत्तर प्रदेश ) असे आहे. हा मुलगा दवणे वस्ती येथील हर्षद दवणे यांच्या कँटीनमध्ये कामाला होता. एका कंपनीत चहा व नाश्ता देण्यासाठी दुचाकीहून गेला असता अंगावर तार तुटून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उच्च दाबाची वीज वाहक तार तुटली कशी? या तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून होत आहे. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. याबाबत म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद देण्याचे काम सुरू आहे.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.