अपघात

चालकविना बुलेट रस्त्याने सुसाट, चालक मात्र गायब..पहा नेमके काय घडले.. ● व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या…

चालकविना बुलेट रस्त्याने सुसाट, चालक मात्र गायब..पहा नेमके काय घडले..
● व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या…

महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव : पुणे नाशिक महामार्गावर एक बुलेट विनाचालक सुरू असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

त्याचं झालं असं की, एक भंगार व्यावसायिक आपल्या बुलेटवरून रस्त्यावरून सुसाट निघाले, मात्र रस्त्याने पायी चाललेल्या जनार्धन दत्तू गांजवे (वय ४७, गांजवेवाडी, ता. जुन्नर) यांना या महाशयांच्या बुलेटची धडक बसली. गांजवे या धडकमुळे गंभीर जखमी झाले. मात्र बुलेटस्वार देखील बुलेटवरून खाली कोसळले. मग झाली ना पंचायत, ही बुलेट तब्बल तीनशे फूट पुढे भरधाव वेगाने गेली. यामुळे पुणे-नासिक महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार पहिला मिळाला. ही घटना ९ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना येथील एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  ( ● व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या महाबुलेटीन न्यूजच्या फेसबुक पेजला भेट द्या…)

अपघातानंतर बुलेटस्वार खाली पडला, मात्र बुलेट महामार्गावरून सुमारे तीनशे फूट पुढे भरधाव वेगाने गेली. त्यानंतर ती एका मालवाहतूक जीपला आडवी जाऊन महामार्गाच्याकडेला जाऊन खाली पडली. यावेळी जीप चालकाने प्रसंगावधान दाखवून जीप थांबवली. यामुळे मोठा अपघात टळला. महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना पाहिला मिळाला. 

■ *आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक करा ‘महाबुलेटिन’चे फेसबुक पेज…*

————————————–

००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.