महाबुलेटीन न्यूज
चाकण : तरुणीशी बोलण्याचा बहाणा करून एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला असल्याची घटना खराबवाडी ( ता. खेड ) येथील वाघजाईनगर मध्ये घडली आहे. याप्रकरणी एका परप्रांतीय तरुणावर म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्तियाक उर्फ छोटू मोहम्मद हनीफ फकीर ( वय १९ रा. अशोक इंडस्ट्रीज कंपनीच्या खोल्यांमध्ये, मूळगाव कानपुर, उत्तर प्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. संबधित तरुणाने पिडीत तरुणीला मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, असे म्हणून खराबवाडी येथील वाघजाईनगर मध्ये आणले व याच ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. तब्बल २० दिवसानंतर या तरुणीने म्हाळुंगे पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.