महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथे चार मित्रांसोबत विहिरीवर पोहायला गेलेल्या २८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज ( दि. ११ सप्टेंबर ) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल लुट्टू भारद्वाज ( वय २८, सध्या रा. खराबवाडी, चाकण ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
गावचे पोलीस पाटील किरण किर्ते यांनी घटनेची माहिती म्हाळुंगे पोलिसांना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण यांच्यासोबत घटनास्थळी भेट दिली. मृतदेह अद्याप वर आलेला नाही. स्थानिक तरुणांनी विहिरीत पोहून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सायंकाळपर्यंत मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे एन डी आर एफ च्या जवानांना पाचारण करण्यात आले असून उद्या सकाळी जवान मृतदेह काढण्यासाठी येणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.