महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशाचे पालन करून सामाजिक अंतर राखून हा कार्यक्रम संपन्न झाला.
खराबवाडी ग्रामपंचायत समोर तलाठी एस. बी. आचारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उद्योजक माऊलीशेठ जंबुकर, पोलीस पाटील किरण किर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी प्रतिनिधी अजित केसवड उपस्थित होते.
नवमहाराष्ट्र विद्यालयात मुख्याध्यापक अविनाश कड यांच्या मार्गदर्शनाखाली खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी
सचिव गोरक्षनाथ कड, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश खराबी, शिक्षक प्रतिनिधी अशोक ठाणगे उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यध्यापिका आशा चव्हाण- जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा समितीच्या अध्यक्षा मधुरीताई खराबी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष रघुनाथ खराबी, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई भट्ट, शिक्षक प्रतिनिधी संतोष भुते उपस्थित होते.
——-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.