महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायत, कोरोना समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी एका दिवसात ४५ वयाच्या पुढील २२३ नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
खराबवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जयश्री महाजन, तलाठी श्रीधर आचारी, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांनी केले आहे.
या लसीकरण शिबिरासाठी पोलीस पाटील किरण किर्ते, आरोग्य सेवक मकसूद शेख, मीना ताजने, ग्रामपंचायत कर्मचारी अजित केसवड, विठ्ठल वर्ये, सुनील खराबी, विशाल खोपडे, सारिका जाधव, गणपत कड, शंकर धोत्रे, कल्पना जाधव, सर्व कर्मचारी, आशा वर्कर सेविका मंदा कड, रेखा धाडगे, कविता म्हस्के, रंजना लांडे, आशा जंबुकर, जयश्री काळकुंड, शुभांगी शिंदे, संगणक ऑपरेटर भूषण हटवाल व प्रथमेश कांबळे यांचे सहकार्य लाभले.
शिबीर उदघाटन प्रसंगी माजी सरपंच हनुमंत कड, माजी सरपंच पांडुरंग बिरदवडे, हनुमान दिंडी सोहळ्याचे माजी अध्यक्ष मधुकर कड, माजी ग्रा. पं. सदस्य रामचंद्र खराबी, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लवंगे, नंदाराम कड, लक्ष्मण खराबी, विलास सावंत, उमाजी कड, उद्योजक प्रमोद टेकाळे, खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कड, सुरेंद्र खराबी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
————-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.