आरोग्य

खराबवाडीत २१२ जणांची अँटीजन रॅपिड टेस्टिंग, १८ जण कोरोना पॉझिटिव्ह.. ● खराबवाडीत व्यापारी व दुकानदारांच्या कोरोना टेस्टिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद, खराबवाडी ग्रामपंचायत, कोरोना समिती व प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुढाकार

खराबवाडीत २१२ जणांची अँटीजन रॅपिड टेस्टिंग, १८ जण कोरोना पॉझिटिव्ह..
● खराबवाडीत व्यापारी व दुकानदारांच्या कोरोना टेस्टिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद, खराबवाडी ग्रामपंचायत, कोरोना समिती व प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुढाकार

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : खराबवाडी ग्रामपंचायत, कोरोना समिती व करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या गावातील व्यापारी व दुकानदारांची अँटीजन रॅपिड टेस्टिंग करण्यात आली. येथील हनुमान मंदिरात आयोजित कोरोना टेस्टिंगला सकाळी साडे दहा वाजता सुरुवात झाली. गावातील सर्व दुकानदारांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत २१२ दुकानदारांची टेस्ट करण्यात आली, त्यापैकी १८ जणांचा प्राथमिक अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

प्रांताधिकारी विक्रम चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी, सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा गटखने, आरोग्य कर्मचारी मकसूद शेख यांनी खराबवाडी येथे २१२ दुकानदारांच्या कोरोना टेस्टिंग केल्या.

यासाठी ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, पोलीस पाटील किरण किर्ते, कर्मचारी अजित केसवड, विशाल खोपडे, प्रकाश लोहकरे, शंकर धोत्रे, विजय जोगदंड, गणपत कड, काशीनाथ बलांडे, कल्पना जाधव, आशा वर्कर सेविका रेखा धाडगे, कविता म्हस्के, रंजना लांडे यांचे सहकार्य लाभले.
——-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.