चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) गावचे पोलीस पाटील किरण किर्ते यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. किर्ते यांना मागील आठवड्यात काही लक्षणे दिसून आल्याने त्यांनी स्वतःहून आपले स्वब खासगी लॅब मध्ये तपासणी साठी पाठविले होते. त्यांचा तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. पोलीस पाटील किर्ते हे मागील तीन महिन्यांपासून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कोरोना योद्धा म्हणून हिरीरीने काम करीत होते. गावातील गरीब व गरजू व्यक्ती, जिल्ह्याबाहेरील व परप्रांतीय कामगार व मजुरांचे स्थलांतर करण्यासाठी पोलिसांसोबत रात्रंदिवस काम करीत होते. मागील आठवड्यात त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःहून आपली तपासणी करून घेतली असता आज ( दि. २९ जून ) रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.