खराबवाडी कोरोनामुक्त करा : उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर

उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची खराबवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट,
मास्क न लावणाऱ्यांवर ग्रामपंचायतने केली दंडात्मक कारवाई, ३००० हजार दंड वसूल,
दरम्यान गावात आणखी एक युवक आढळला कोरोना पॉझिटिव्ह

महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी खराबवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतने कोरोना संदर्भात केलेल्या प्रशासकीय कामाचे कौतुक केले. कोरोनाशी लढा देताना टिमवर्कने काम करा, सॅनिटायझर व मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा त्याचबरोबर खराबवाडी गाव कोरोनमुक्त करा, असे त्यांनी आवाहन केले. मागील पंधरवड्यात सापडलेल्या ११ रुग्णांपैकी अजूनही चार जण ऍक्टिव्ह असून हि साखळी रोखून झिरो करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केले. मात्र आजच गावात आणखी एक युवक पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. तरीही आम्ही स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळून हि साखळी रोखू असे आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतने दिले आहे.
दरम्यान आज चाकण-तळेगाव रस्त्यावरून व गावातून मास्क न घालता फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायतने दंडात्मक कारवाई करून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांनी दिली. यावेळी विस्तार अधिकारी सेवक थोरात, आरोग्य अधिकारी मकसूद शेख, तलाठी आचारी भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, पोलीस पाटील किरण किर्ते, अजित केसवड, विठ्ठल वर्ये, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 day ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

5 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.