चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या १३ जणांच्या रिपोर्ट पैकी १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला आहे. मात्र १३ पैकी ३ व मागील आठवड्यातील ४ असे ७ रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने अजून नागरिकांचा धोका टळलेला नाही. तसेच गावातील एका कंपनीत परिसरातील पाचजण पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विशेष म्हणजे गावात एका पार्लर चालविणाऱ्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने विशेषतः महिला वर्गाचा जीव भांड्यात पडला आहे. दहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत. वाढदिवसाच्या कार्यक्रमातील बारा व भाजीवाला एक असे तेरा जणांचे रिपोर्ट तपासणीला पाठविण्यात आले होते. दरम्यान चाकण मधील युनिकेअर व क्रिटीकेअर हॉस्पिटल मध्ये रुग्णांसाठी जागा शिल्लक नसल्याने नवीन रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच खराबवाडीतील आज पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांना उपचारासाठी कोठे न्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना सध्या महाळुंगे येथील म्हाडाच्या कोवीड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.