पुणे जिल्हा

खाकी वर्दीतील देवदूतामुळे सहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्ध बापाची लेकाशी झाली भेट, ● बाप सापडला जंगलात, मुलाचा आनंद मावेना गगनात,

खाकी वर्दीतील देवदूतामुळे सहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्ध बापाची लेकाशी झाली भेट,
● बाप सापडला जंगलात, मुलाचा आनंद मावेना गगनात,

महाबुलेटीन न्यूज : नाजीम इनामदार 
राजगुरूनगर : गेली सहा वर्षा पासून बेपत्ता असलेल्या वृद्ध बापाला शोधण्यासाठी मुलाने खूप प्रयत्न केले. मात्र एका पोलिसाच्या अथक प्रयत्नाने बाप-लेकाची भेट घडवून सुखरूप घरी पोहचविण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरात जंगलमय असलेल्या एका झाडाखाली एक वयोवृद्ध व्यक्ती गेली दोन दिवसांपासून  झोपलेल्या अवस्थेत पडून आहेत, अशी माहिती खेड पोलिस स्टेशनचे पोलीस प्रविण गेंगजे यांना मिळाली. त्यावेळी गेंगजे यांची ड्युटी चासकमान धरण येथे होती. माहिती मिळताच प्रवीण गेंगजे हे सदर ठिकाणी जाऊन परिस्थिती पहिली. ती व्यक्ती भिजलेल्या अवस्थेत तिथे पडून होती. वयोवृध्द असल्याने व अंगात अशक्तपणा असल्याने सदर व्यक्तीला चालता येत नव्हते. श्री. गेंगजे यांनी सहकारीच्या मदतीने त्या वयोवृद्ध व्यक्तीला जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेड खाली बसविले व प्रथम त्यांना पोटभर जेवण दिले.

चौकशीअंती त्या वृद्ध व्यक्तीचे नाव एकनाथ ज्ञानु कारंडे ( वय ६५ वर्षे, रा. उमरकांचन, ता.पाटण, जि.सातारा ) असल्याचे निष्पन्न झाले. गेंगजे यांनी त्वरित सातारा पोलिस स्टेशनला याबाबत खबर दिली. तेथून उमरकांचन पोलिस स्टेशनच्या मार्फत पोलीस पाटील मोहीते यांच्याशी संपर्क साधला. मोहिते यांनी त्या वृद्ध व्यक्तीबाबत सर्व माहीती प्रविन गेंगजे यांना दिली. त्यानुसार श्री. गेंगजे यांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या मुलाला माहीती सांगितली असता मुलाने तात्काळ खेडला येतो म्हणुन सांगितले. मुलगा राजेश एकनाथ कारंडे यांनी आपले सहकारी मित्र अमर रसाळ आणि अशोक पैठणकर यांना घेऊन रात्री 10.30 वाजेपर्यंत खेड पोलीस गाठले. खेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली संबधीत वयोवृद्ध व्यक्तीला त्यांच्या मुलाच्या हवाली केले.

यावेळी मुलगा राजेश एकनाथ कारंडे यांनी सांगितले की, आम्ही पुण्यात पिंपळे निलख भागात कामाला असल्याने त्या ठिकाणावरुनच माझे वडील हे ६ वर्षापासुन बेपत्ता होते. आम्ही वाकड पोलीस स्टेशनला हरविल्याबाबत तशी रितसर तक्रार दाखल केली होती. खुप वेळा शोध घेऊन देखील वडील सापडत नव्हते, परंतु आज खेड पोलिसांच्या मदतीने आमचे वडील सुखरूप मिळाल्याबद्दल प्रवीण गेंगजे व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करीत आनंदाने घरी रवाना झाले. 

पोलिसांना कर्तव्यासाठी वेळ प्रसंगी कठोर व्हावे लागते, असे असले तरी या वर्दीतही मनुष्य असतो त्यालाही मन, भावना असतात.आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही वेळ नसतो अशा वेळी ज्याला कोणी नसते अशा संकट काळात देवदूत म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.