खाकी वर्दी…कर्तव्यापलीकडेही !

महाबुलेटिन नेटवर्क / हनुमंत देवकर
चाकण : कर्तव्यभाव जपताना सामाजिक भान जपणाऱ्या त्या कोविड योध्याचे कौतुक आहे. खाकी वर्दीतील कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना ‘तो कोविड योद्धा’ आपल्या सहकाऱ्यांचीही काळजी घेत आहे.
चाकण  एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) पोलीस चौकीतील पोलीस हवालदार अरुण लगड मेजर ( वय ५० वर्ष, रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे ) हे त्या कोविड योध्याचे नाव. मेजर सामाजिक भावनेतून नियमितपणे  पोलीस चौकी मध्ये फवारणी करून पोलीस चौकी निर्जंतुकीकरण करून घेत आहेत. फवारणीसाठी लागणारा पंप त्यांनी स्वखर्चाने आणला असून ते नियमितपणे फवारणी करतात. आपल्यासोबत कर्तव्यावर असणाऱ्या सहकाऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीबाबत दक्षता हा कोविड योद्धा घेत आहे. ते दररोज सकाळी कामावर आल्यावर पहिल्यांदा संपूर्ण पोलीस चौकीची फवारणी करतात. चौकी निर्जंतुक केल्यानंतर मग कामाला लागतात. मेजर यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि सहकाऱ्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्याच्या स्वभावाचे कौतुक नाही झाले तर नवलच ! त्यांची ही कृती निश्चितच कोविड योध्याला शोभणारी व कौतुकास्पद आहे.यासाठी त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांचे सहकार्य लाभते.
admin

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

8 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.