अरे श्रावणा श्रावणा
शुद्ध सात्विक व्रतस्थ
कथा कल्पित पुराणे
यांचे आता बडे प्रस्थ॥धृ ॥
भाव भोळ्या माणसास
तूच केले बा रे व्यस्त
पुजा कथा पारायणे
नाही राहिले रे स्वस्त ॥१॥
धावपळ जीवनाची
तुझ्यामुळे अस्ताव्यस्त
घर नोकरी संसार
जिणं स्त्री चं झालं व्यस्त ॥२॥
त्यात पुजा पारायणे
किती व्हावे तिने त्रस्त
आता कुठे संशोधिले
व्हावे अस्तित्व उध्वस्त ? ॥३॥
तुझ्या सोमवारासाठी
बिल्व व्हावे का रे नष्ट
झाली वृक्ष तोड अती
तुला सांगते हे स्पष्ट ॥४॥
–निसर्ग सखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.