काव्यमंच : श्रावणाची चित्रकारी
—————————————–
*🖌श्रावणाची चित्रकारी🖌*
आला श्रावण श्रावण
हिर्वा गालिचा घेऊन
पावसाच्या सरीतून
अहा ! डोकावते ऊन ॥धृ ॥
सुर्य बिंबा सवे दवं
मन घेते लुभावून
तृणं पात्यात हिरवे
पाचू दिसती शोभून ॥१॥
लुभावतो हा श्रावण
लक्ष सारेच वेधून
भान हरविते भान
असा श्रावण पाहून॥२॥
क्षितिजात रेखियली
इंद्रधनूची कमान
पहा फिरुन पाहते
मीही उंचावून मान॥३॥
धरेवर सुवर्णाचं
सुर्य किरण नर्तन
असं श्रावण करतो
अहा! सुरेख चित्रण॥४॥
— निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.
🖌🌄🖌🌄🖌🌄🖌
Recent Posts
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.