मैत्री म्हणे निभवितो
बळी राजाशी रे नाग
एक सजीव जीव तो
देव कसला रे नाग ॥धृ ॥
कधी येईल माणसा
तुला वास्तवाची जाग
कथा कल्पियली कुणी
माणसारे आता जाग॥१॥
जरा येरे वास्तवात
सत्य शोधुनिया बघ
येरे माणसा सत्यात
काळ बदलला बघ॥२॥
मला एकच ठाऊक
पंचमी रे फाल्गुनात
रंग भरते नात्यात
नातं तिचं जीवनात॥३॥
नाग वन्य जीव त्याचं
कसं जुळावं रे नातं
कसा नेईल बहिण
इवल्याशा वारुळात॥४॥
नवा जोडून विचार
घ्यावा तुही विचारात
सत्य पडताळून हे
आण जरा आचारात॥५॥
–निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
This website uses cookies.