काव्यमंच

कविता : ग्रुपचं नातं…

*कविता : ग्रुपचं नातं*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*जपायचं नातं म्हणून,*
*निर्माण केला ग्रुप..*👬🏻👭🏻
*सगळेच आपले म्हणून,*
*भावना जपा खूप..*

*कोणी दिला रिप्लाय,*
*म्हणून हुरळून जायचं नाही..*💃🏻
*आणि नाही दिला रिप्लाय,*
*म्हणून खंत मानायची नाही..*☹️

*सर्वांची मतं कायम,*
*एकसारखी असतील कशी..*
*नकारार्थी, सकारार्थी,*
*प्रत्येकाची वेगळी अशी..*👍

*राखायची असेल अबाधित,*
*एकमेकांची साथ..*
*तर द्यावाच लागतो सर्वांना,*
*प्रेमाचा हात..*🤝🏻

*प्रत्येकाचं मत,*
*वेगळं असायलाच हवं..*
*तरच घडेल इथे,*
*रोज काहीतरी नवं..*🥳

*काय बरं होईल,*
*नावडत्या जोकवर हसलं तर ..*😀
*मनातल्या भावना झाकून,*
*थोडसं फसलं तर..*

*फक्त एकच करा मित्रांनो,*
*वेळ काढा थोडा..*
*प्रत्येक जण असावा,*
*दुसऱ्यासाठी वेडा..*🤩

*कधी गडबड, कधी बडबड,*
*कधी बरीच शांतता..*
*दाखवून द्या ना एकदा,*
*अंतरंगातील एकात्मता..*❤️

*दुरावलेल्या दोन मनांत,*
*एक पूल बांधणारा..*
*एखादा असतोच ना,*
*निखळणारे दुवे सांधणारा..*🥰

*ग्रुप असो नात्यांचा,*
*वा असो तो मित्रांचा..*
*आपल्या हजेरीने बनवा,*
*स्वप्नांमधल्या चित्रांचा..*
🏝️🏖️🗼🏜️🏕️🌅🏞️

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.