दुनियेत हेच खरं
——————
आली सरं सरं सरं
आली श्रावणाची सर
रुप सृष्टीचं घेऊन
अहा हसरं नाचरं ॥धृ ॥
आली सर तशी गेली
ऊन हासलं हासरं
आली फिरुन ऊन्हात
सर जशी मोतीसर ॥१॥
हिच्या सोबत कमान
इंद्रधनु ची धुसरं
दृश्य असं हे अनोखं
काय सांगू मनोहर ॥२॥
अशी श्रावणाची भासे
उन्हामधे सोनसर
रक्षा बंधनाचा त्यात
सोनियाचा अवसर ॥३॥
नाही मोठी याच्याहून
बहिणीला सोनसर
बळ लाभो ह्या नात्याला
दुनियेत हेच खरं ॥४॥
निसर्गसखी मंगला मधुकर रोकडे
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.