भाऊ बहिणीचं नातं
———————
सोने चांदी हिरे मोती
मोल सार्यांचच होतं
धन रक्षा बंधनांचा
नाही मोल याचं होत ॥धृ ॥
असं अनमोल धन
कुठे पाहिलं का होतं
याच्या पुढती फिके रे
अवघेच गणगोत ॥१॥
प्रित अनोखीच याची
जशी समयीची ज्योत
फिका रत्न माणिकांचा
तेजस्वितेचाही झोत ॥२॥
येता सण हा मोलाचा
सोनं काळजाचं होतं
सोनियाच्या कोंदणाचं
मोल अनमोल होतं ॥३॥
सोनियाचं कोंदण हे
असं अनमोल होतं
असं बहु मोलाचं ग
भाऊ बहिणीचं नातं ॥४॥
— निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
This website uses cookies.