जय किसान चा स्वर
तेंव्हा होता निनादला
धन धान्य समृध्दीने
देश होता माझा भला॥१॥
देश सुजल सफल
राष्ट्र गीतात उरला
शेती पासून बळीही
दुरावत हा चालला॥२॥
कधी ओला कधी सुका
काळ दुष्काळाचा आला
बघ यंत्राने मानव
बळी गेला आळसाला॥३॥
जाऊ नये आळस हा
बघ बैला कळसाला
म्हणूनच आठवला
काळ मला तुझा पैला॥४॥
— निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
🐂🐂 🐂🐂🐂🐂 🐂🐂
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.