कसा राहू वारुळात
श्रावणाच्या पावसात
धरा भिजते जळात
जल साचते साचते
नागोबाच्या वारुळात॥धृ ॥
कसा राहिल नागोबा
जलमय वारुळात
जन डुंबले डुंबले
अंधश्रद्धेच्या जळात॥१॥
आली पंचमी पाहिला
म्हणे नाग वारुळात
येऊ म्हणे हा बाहेर
कसा राहू वारुळात ॥२॥
–निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.
अशी झाली जलवृष्टी
श्रावणाची सुरु झाली
पहा झिमझिम वृष्टी
अहा बहरुन आली
इथे तिथे सारी सृष्टी ॥धृ ॥
जशी बहरली सृष्टी
तशी माझी शब्दसृष्टी
निसर्गाच्या सखी वर
झाली शुभेच्छांची वृष्टी॥१॥
काय सांगू अभिषेक
जशी झिमझिम वृष्टी
चिंब चिंब झाली पहा
मंगलेची मनसृष्टी॥२॥
धन्य झाली ही मंगला
अशी झाली अभिवृष्टी
धन्य धन्य तिच्या सवे
झाली तिची शब्दसृष्टी॥३॥
आजवरी पाहिली मी
माझ्या वसुधेला कष्टी
चिंब चिंब झाली धरा
अशी झाली जल वृष्टी॥४॥
–निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.
गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…
शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…
बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
This website uses cookies.