सामाजिक

आळंदी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा : नागरीकांची मागणी

महाबुलेटीन नेटवर्क / अर्जुन मेदनकर
आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच सात महिने एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागला अजून कीती दिवस असा एक दिवसाड पाणी पुरवठा होणार..? आळंदी शहराला रोज पाणी कधी मिळणार ? यासाठी आळंदी शहरातील काही जागरुक युवकांनी आळंदी नगरपरिषदेला निवेदन देऊन आळंदी शहराला रोज पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या कडे देण्यात आले. यावेळी धनंजय घुंडरे, प्रसाद बोराटे, अमित घुंडरे, लखन घुंडरे उपस्थित होते.
आळंदी नगरपरिषदेने १ जानेवारी २०२० पासून आळंदी शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला उन्हाळ्यात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे आणि कोरोणाचे संकट असल्याने आळंदी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य केले, परंतु आता पावसाळा सुरू झाला तरी आळंदी शहरात पाणी पुरवठा सुरळीत का होऊ शकला नाही ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.  आज गेली अनेक वर्षे आळंदी शहरातील बहुतेक सर्वजण पिण्याचे पाणी विकत घेत असतात. नगरपरिषदेचे पाणी हे फक्त कपडे आणि भांडी धुण्यासाठी वापरत असतात.
आळंदी शहरातील पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा हीच नवीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्याकडून आळंदी शहरातील नागरिक अपेक्षा करत आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.