महाबुलेटीन न्यूज
चाकण : खड्डयांमुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे यांनी चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून शासनाचे लक्ष वेधले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, पै. गणेश बोत्रे मित्र परिवार व गाथा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी देहू फाट्यापासून कडाचीवाडी पर्यंत रस्त्यावरील खड्डे व साईड पट्ट्या जेसीबीच्या साहाय्याने मुरूम टाकून बुजविल्या. व रोलर फिरवून लेव्हल काढण्यात आली.
चाकण-तळेगाव रस्त्यावर कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, म्हाळुंगे, खालुंब्रे, येलवाडी, सांगूर्डी, कान्हेवाडी तर्फे चाकण गावच्या हद्दीत मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांच्या या समस्येकडे बोत्रे यांनी प्राधान्याने लक्ष देऊन आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.