महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्जदारांना मोठा दिलासा दिला असून, मोरेटोरियम मुदतीच्या सहा महिन्यांच्या व्याजातील व्याज माफ करण्यास सरकार तयार आहे. परंतु, या व्याज माफीचा फायदा केवळ दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर मिळणार आहे. याशिवाय मार्च ते ऑगस्ट या कालावधीत ज्यांनी थकबाकी भरली आहे त्यांनाही व्याजावरील व्याज माफीचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, सरकार छोट्या कर्जदारांना पाठिंबा देण्याची परंपरा सुरूच ठेवेल. प्रतिज्ञापत्रानुसार व्याज माफ किंवा चक्रवाढ व्याज माफीमुळे बँकांवर पडणारा बोजा सरकार उचलेल. यासाठी संसदेची मंजुरी घेण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.
◆ एमएसएमई कर्ज
◆ शैक्षणिक कर्ज
◆ गृह कर्ज
◆ ग्राहक टिकाऊ कर्ज
◆ क्रेडिट कार्ड ड्यू
◆ वाहन कर्ज
◆ व्यावसायिकांचे वैयक्तिक कर्ज
◆ सवलत कर्ज
या सर्व घटकांचे व्याज माफ होऊ शकेल, या कर्जमाफीसाठी 6 लाख कोटी रुपये लागतील.
सर्व प्रकारच्या कर्जाच्या मोरेटोरियम अवधीचे कर्ज माफ केल्यास 6 लाख कोटी रुपयांचा बोजा पडेल. यामुळे बँकांच्या एकूण नेटवर्थमध्ये मोठी कपात होईल. मंत्रालयानुसार एखाद्या व्यक्तीचे कर्ज दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्याला व्याजावरील व्याज माफीचा लाभ मिळणार नाही.
मोरेटोरियममध्ये ईएमआय भरणाऱ्यांबद्दल स्पष्टीकरण नाही
प्रतिज्ञापत्रात मोरेटोरियम कालावधी दरम्यान ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड ड्यू भरणाऱ्यांसाठी कोणत्या लाभांबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
सरकारने पलटली तज्ज्ञ समितीची शिफारस माजी सीएजी राजीव महर्षी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींना पलटवत केंद्र सरकारने व्याजावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीने व्याजावरील व्याज माफ न करण्याची शिफारस केली होती.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.