महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील जुन्या पुणे-नाशिक रस्त्याजवळील पत्र्याच्या शेडच्या भाजी मंडईत कचरा गोळा करणाऱ्या पुरुषाचा मृतदेह दुपारी अडीचच्या सुमारास आढळला. कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास राजाराम घुंबरे, ( वय-४८, सध्या रा. चाकण, मुळ रा. पाथर्डी, जि. अहमदनगर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.
चाकण बसस्थानकाजवळील भाजी मंडईत पत्र्याच्या शेडमधील सिमेंटच्या कट्ट्यावर शनिवारी दुपारी अडीचच्या पूर्वी खून करण्यात आला असून याबाबत नाणेकरवाडीचे पोलीस पाटील राजू नाणेकर यांनी पोलिसांना माहिती दिली.
—
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.