पुणे जिल्हा

कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी खेड तालुक्यात शिवसेनेचे आंदोलन, भाजप सरकारचा केला निषेध

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : कोरोना संकटात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या आत्मघाती निर्णयाविरोधात 
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि  माजी आमदार सुरेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या विरोधात शासनाला निवेदन देण्यात आले. खेड तहसील कार्यालय आवारात शिवसेनेच्या वतीने सोशल डिस्टन्सचे पालन करून व मास्क परिधान करून हे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, जिल्हा सल्लागार प्रकाश वाडेकर, महिला आघाडी संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, महिला आघाडी तालुका प्रमुख नंदाताई कड, पंचायत समिती खेडचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती आरगडे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, जि. प. सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, रूपाली कड, माजी खेड तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, उपतालुका प्रमुख महादेव लिंभोरे, गणेश मांडेकर, लक्ष्मण जाधव, युवा सेनेचे उपतालुका विशाल पोतले, राजगुरूनगर शहरप्रमुख दिलीप तापकीर, महिला आघाडी सहप्रमुख उर्मिला सांडभोर, पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, दशरथ बोत्रे, देवराम वाडेकर आदींसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे म्हणाले की,
“लॉकडाऊनच्या काळात कवडीमोल भावाने आपला शेतमाल विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना या आठवड्यात कांद्याला तीन ते चार हजारापर्यंत उच्चांकी भाव मिळाला असल्यामुळे शेतकरी राजा समाधानी होता, परंतु केंद्रातील भाजपा सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. त्याबद्दल आम्ही खेड तालुका शिवसेना पक्षाच्यावतीने केंद्र सरकारचा तीव्र निषेध करीत आहोत.

महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे म्हणाल्या कि, “शिवसेनेने यापूर्वीही अनेकदा सत्तेत असूनही शेतकरी हितासाठी अनेक लढे यशस्वीपणे लढले आहेत. तरी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी ताबडतोब उठवावी, अशी आमची मागणी आहे. कांदा निर्यात बंदी ताबडतोब न उठविल्यास कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये देखील शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना संपर्क नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.”
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

21 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.