पुणे जिल्हा

‘काम गेले… पण गड आला’…

 

‘काम गेले… पण गड आला’….मदतीला धावून…

महाबुलेटिन न्युज/तुषार वहिले
वडगाव मावळ : तिकोणा पेठ, मावळ येथील रहिवासी गुरुदास मोहळ याला लहान पणापासून गडकिल्ले फिरण्याची आवड, जवळील तिकोणा किल्ला हा गुरुदासचा जणू गुरुच!!!

मावळातील गडभटकंती ‘दुर्ग संवर्धन संस्था‘ ही गेल्या अनेक वर्षांपासून तिकोणा गडावर श्रमदानाचे काम करते. त्यांनी गडावरील पाण्याच्या टाक स्वच्छ ठेवणे, दरवाजा, बुरुंज, पायऱ्या यांच्या दुरुस्ती करणे अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत. संस्थेतर्फे गेल्या ३ वर्षांपासून गडावर गणेशोत्सव साजरा केला जातो. गुरुदास हा सुद्धा या संस्थेच्या वतीने गडावर श्रमदान मोहिमेत सहभागी असतो.

गुरुदास हा खाजगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामावर जायचा, परंतु गणेशोत्सव काळात ५ दिवस-रात्र गुरुदास श्रीगणेशाची पूजा-अर्चा व संरक्षणासाठी गडावरच मुक्कामी होता. पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करून तो नेहमीप्रमाणे कामाला गेला, परंतु त्याला कामावर येऊ नको असे सांगण्यात आले. गुरुदास नाराज होऊन घरी आला. पोटापाण्याचा प्रश्न त्याच्यापुढे होता. ही बाब संस्थेचे वरिष्ठ मार्गदर्शक विनायक रेणके यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी गुरुदासला गडावरच ‘गडपाल‘ म्हणून सध्या काम करण्यास सांगितले व त्याचा योग्य मोबदला देण्याचे सांगितले.

आपली गडकिल्ल्याची आवड जोपासताना काम करता करता पोटापाण्याची पण व्यवस्था होती, म्हटल्यावर गुरुदास सुद्धा तयार झाला. सध्या त्याला संस्थेचे सर्व सदस्य मिळून मानधन देणार असल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी किरण चिमटे यांनी दिली.

 

मावळातील प्रत्येक किल्ल्यावर एक गडपाल शासनातर्फे नियुक्त करावा, त्यामुळे किल्ल्यावर हुल्लडबाजी होणार नाही. स्वच्छता राखली जाईल व स्थानिक नागरिकाला काम मिळेल, अशी मागणी संस्थेच्या वतीने होत आहे.

सध्यातरी ‘काम गेले, पण गड आला’….मदतीला धावून… अशी प्रतिक्रिया गुरुदासने महाबुलेटिन न्युजला दिली व संस्थेचे आभार मानले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

12 hours ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

3 days ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

5 days ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

7 days ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 week ago

MahaBulletin — 05 May 2026

सोमवार, ४ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकांवरील…

1 week ago

This website uses cookies.