पुणे जिल्हा

सविंदणे येथे बिबटयाचा गोट फार्मवरील शेळ्यांवर हल्ला, शेतकऱ्याचे पंधरा लाखांचे नुकसान

 

महाबुलेटीन न्यूज : अरुणकुमार मोटे
शिरूर : सविंदणे ता. शिरूर येथे विनायक नरवडे या शेतकऱ्याच्या आई गोट फार्म मधील नर प्रजातीचे १० बोकड बिबटयाने केलेल्या हल्ल्यात ठार मारले असून ९ बोकड गंभीर जखमी केले आहे.

रात्रीच्या वेळी बिबटयाने कपांऊडलगत असणाऱ्या झाडावरुन उडी मारत फार्ममध्ये प्रवेश केला व तेथे असलेल्या बोकड या प्राण्यांवर हल्ला केला. सानेन प्रजातीचे हे बोकड असून एका बोकडाची किंमत एक ते अडीच लाख रुपयांपर्यत आहे. अंदाजे एकुण पंधरा लाखांचे या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. मोठया कष्ठाने उभ्या केलेल्या गोट फार्मवर बिबटयाने अचानक हल्ला केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून वन विभागाने तातडीने या गोष्टीची दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. घटनास्थळी वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक ऋषिकेश लाड वनकर्मचारी हनुमंत कारकुड, वनपाल चारूशिला काटे , पशुवैदयकिय आधिकारी डॉ.गोरख सातकर , डॉ . प्रकाश ऊचाळे यांनी भेट दिली. .

सध्या सविंदणे येथील लंघेमळा, नरवडे मळा, किठेवस्ती, प्रगतीनगर , दाहीजावस्ती या ठिकाणी बिबटयाचे दिवसाढवळ्या दर्शन होत आहे. वनविभागाने ताबडतोब पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.

 

बिबट्या आढळल्यास दक्षता घेत फटाके, बॉम्ब फोडावेत. बाहेर जाताना समुहाने व मोठ्याने गप्पा मारत, आवाज काढीत जावे. रात्रीच्या वेळी शेतवस्तीवरील नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. सोबत बॅटरी, काठी व सुरक्षितता म्हणून इतरांना ही सोबत घ्यावे. एकमेकांना मोबाईलवरून कल्पना द्यावी.
— मनोहर म्हसेकर ( वन परीक्षेत्र अधिकारी, शिरूर )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.