महाबुलेटीन न्यूज : अरुणकुमार मोटे . .
शिरूर : पुणे ग्रामीण पोलिस दलातील बडतर्फ पोलीस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड खुनी हल्ल्या प्रकरणी शिरुर पोलिसांना हवा होता. अखेरीस सुमारे एक वर्षानंतर तो शिरुर पोलिसांना शरण आला आहे.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पत्रकार परिषदेत घेउन माहिती दिली की, सुमारे एक वर्षापूर्वी शिरुर तालुक्यातील करडे येथील ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान उपसरपंच अंकुश बांदल यांच्यावर चोरीच्या उद्देशाने खुनी हल्ला केल्यांच्या प्रकरणात चार आरोपी निष्पन्न झाले होते. त्यातील दोन आरोपी अटक केले असून एक फरार आहे. तर दुसरा आरोपी पोपट हा देखील पोलिसांना हवा होता.
या हल्ल्याचा कट रचल्या प्रकरणी पोपट गायकवाड वर शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचा बडतर्फ पोलीस नाईक पोपट गायकवाड हा निष्पन्न झाल्याने त्यावेळी पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. या गुन्ह्याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मोठ्या शिताफीने तपास करून दोन आरोपींना अटक केली होती, तर दोन आरोपी अद्यापही हवे होते. अखेरीस एक वर्षाच्या कालावधी नंतर बडतर्फ पोलिस कर्मचारी पोपट गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान आरोपी यास शिरूर न्यालयात हजर केली असता न्यालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितले. पोपट गायकवाड वर यापूर्वी ही अहमदनगर जिल्हातील पारनेर येथे देखील तबाखू जन्य प्रदार्थाची लुटमारीचा गुन्हा दाखल आहे,पोपट गायकवाड हा पोलिस दलातील कर्मचारी असल्याने त्याला पोलिस दलातील गुन्हयाचा तपास करण्याच्या पध्दती माहित असल्याने तो सतत पोलिसांना गुगांरा देत असे. आता त्याचा अजून कोणत्या गुन्हयात सहभाग आहे का किंवा कोणता गुन्हा केला आहे. याचा तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे करत आहेत.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.