महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
आळंदी देवाची : श्री संत एकनाथ महाराज मिशन यांच्या वतीने दिला जाणारा ‘ स्वर मार्तंड पुरस्कार ‘ आळंदी देवाची येथील कृष्णाई संगीत विद्यालयाचे संचालक भजनसम्राट, गायक गुरुवर्य कल्याणजी गायकवाड यांना श्री क्षेत्र पैठण येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर समीतीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गीरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कीर्तनकार एकनाथ महाराज मिशनचे संस्थापक अध्यक्ष हभप. योगिराज महाराज गोसावी यांनी केले होते.
यावेळी भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री, भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले, सुप्रसिद्ध कीर्तनकार अमृताश्रम स्वामी जोशी महाराज, तारकेश्वर गडाचे महंत हभप. आदिनाथ महाराज, पंढरपुर विठ्ठल रखुमाई संस्थानचे विश्वस्त हभप. जळगावकर महाराज, नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, कीर्तनकार हभप. वारींगे महाराज मुंबई, कीर्तनकार भरतमहाराज, कीर्तनकार अशोकमहाराज पांचाळ आदी संत महंत मान्यवर उपस्थित होते.
मला मनापासून आनंद होतोय कारण हा पुरस्कार म्हणजे साक्षात श्री संत एकनाथ महाराज यांचेच आशीर्वाद आहेत, अशा शब्दात कल्याणजी गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.