खेड

कडूस विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडित लक्ष्मण मोढवे बिनविरोध

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
कडुस : खेड तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडीत लक्ष्मण मोढवे यांची, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेंडे यांच्या कार्यप्रणालीवर विश्र्वास असलेले कडूसच्या पट्टयातील सर्वसामान्य कार्यकर्ता व खंदे नेतृत्व म्हणून पंडीत मोढवे यांचे नाव घेतले जाते.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात सहकारात अग्रगण्य असलेल्या व सुमारे ७५ वर्षांची परंपरा असलेल्या या सहकारी सोसायटीवर अध्यक्षपद भुषविण्यासाठी नेहमीच चढाओढ लागलेली असते. आत्तापर्यंत पंडित मोढवे यांनी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य, एकदा उपसरपंच व आता दुसऱ्यांदा चेअरमन पदाची धुरा हाती घेतलेली आहे.
सर्वांना पदाची संधी मिळावी या हेतूने विद्यमान अध्यक्ष बाजीराव शिंदे, उपाध्यक्ष संगीता अरगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. कोरोनाच्या पाश्वभुमीवर सोशल डिस्टंन्सींग पाळून व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जे. बी. मुलाणी, सचिव तात्यासाहेब कल्हाटकर यांनी काम पाहिले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेंडे, दामोधर बंदावणे, निवृत्ती नेहेरे यांच्या हस्ते नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व सन्माननिय सदस्य, ग्रामस्थ, सभासद शेतकरी तसेच मान्यवर उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.