महाबुलेटीन न्यूज
चाकण : जुन्नर उपविभागीय बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विलासराव काळुराम कड, उपाध्यक्षपदी मावळ तालुक्यातील राम आडकर, तर संचालकपदी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे चाकण कार्यालय प्रमुख गोविंदराव निवृत्ती दौडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर व मावळ या पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र व अग्रगण्य असणारी ही पतसंस्था आहे.
मावळते अध्यक्ष स्वप्नील काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. सचिव श्री. रूकारी यांच्या उपस्थितीत सदरील कार्यक्रम पार पडला. खेड बाजार समितीचे सहाय्यक सचिव संतोष गायकवाड, माजी अध्यक्ष शामराव बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यांच्या निवडीबद्दल खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे, सर्व संचालक व कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.
नवनिर्वाचित अध्यक्ष विलास कड यावेळी म्हणाले, “उत्तर पुणे जिल्ह्यातील सेवकांची ही संस्था असून अग्रगण्य आहे. संस्थेचे कामकाज पारदर्शीपणे चालते. या संस्थेचा अजाण वटवृक्ष व्हावा व सर्वांना बरोबर घेऊन संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे करणार आहे.”
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.