आरोग्य

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व सीईओ आयुष प्रसाद यांची चाकण एमआयडीसीतील एअर लिक्विड ऑक्सिजन कंपनीला भेट… ● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ८५ टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय कारणास्तवच वितरित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना…

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व सीईओ आयुष प्रसाद यांची चाकण एमआयडीसीतील एअर लिक्विड ऑक्सिजन कंपनीला भेट…
● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ८५ टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय कारणास्तवच वितरित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना…

हनुमंत देवकर 
चाकण एमआयडीसी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चाकण एमआयडीसीतील सावरदरी ( ता. खेड ) येथील एअर लिक्विड ऑक्सिजन कंपनीला भेट देऊन ऑक्सिजन उत्पादन, उपलब्धता व पुरवठा याची माहिती घेतली.

ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत ही भेट होती. कोरोनाग्रस्त रुग्णांना अक्सिजन कमी पडू नये म्हणून ८५ टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय कारणास्तवच वितरित करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या. आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुद्धा सुरू आहे. तसेच ऑक्सीजन निर्मिती मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क करण्याच्या सूचना सुद्धा संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
—-

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.