महाबुलेटीन न्यूज
चाकण ( पुणे ) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे संस्थापक, राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, जनता शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष, चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकणचे सचिव, हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी दत्तात्रय भिकोबा शिंदे उर्फ मामासाहेब शिंदे (वय ९३ वर्षे ) यांचे आज ( दि. १४ ऑगस्ट ) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्यामागे दोन मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते व दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे संचालक संजय व राजेंद्र शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच चक्रेश्वर चरणी प्रार्थना!
त्यांचा अंत्यविधी आज दि. १४ सकाळी ठीक ११.०० वाजता चक्रेश्वर मंदिर स्मशानभूमी, चाकण, ता. खेड, जि. पुणे येथे होईल.
कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व नियमांचे पालन करून अंत्यविधी होईल .
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.