महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
घोडेगाव : आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज गायकवाड (वय ८८) यांचे दि. २२/११/२०२० रोजी पहाटे १ वाजून ५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे ते चालक, अध्यक्ष होते. गेली ६८ वर्षे त्यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. आळंदी येथील माऊलींच्या मंदिरात, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मंदिरात तसेच भामचंद्र डोंगर, गावडेवाडी या ठिकाणी त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी साक्षरता, व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. विविध सामाजिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. आळंदी येथील धर्मशाळा बांधण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड व पत्रकार मधुकर गायकवाड यांचे ते वडील होत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.