यंदा जेजुरीत माऊलींचे आगमन न झाल्याने जेजुरी सुनी सुनी…

जेजुरी ( दि. १८ ) प्रतिनिधी : सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत आज दर वर्षीप्रमाणे माऊलींचे आगमन न झाल्याने सारी जेजुरी नगरी सुनी सुनी वाटत होती.पुर्वापार प्रथेप्रमाणे आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी निघाल्यावर पुणे,सासवड असे मुक्काम करीत आज जेजुरी नगरीमध्ये हे येत असतो.परंतु यंदा करोना आजारामुळे माऊलींचा पालखी सोहळा निघू शकलेला नाही.माऊलींचे लहान बंधू संत सोपानकाकांच्या सासवडमधून पहाटे पालखी सोहळा निघाल्यावर जेजुरीत साडेपाचच्या सुमारास पोहोचतो.खंडोबाचा गड लांबूनच दिसू लागल्यावर दिंडीतील वारकरी बांधवांच्या आनंदाला उधाण येते.विठु नामाच्या गजरा बरोबरच यळकोट-येळकोट जय मल्हार असा जय घोष सुरु होतो.

वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर सारा थकवा विसरून जोरात नाचत खंडोबाची पारंपारिक गाणी,भारुडे गायली जातात.माऊलींचा पालखी रथ गावात प्रवेश करताच ग्रामस्थांकडून पिवळ्याधमक भंडार्‍याची मुक्त उधळण केली जाते.यावेळी मात्र हा आनंद सोहळा जेजुरीकरांना आपल्या डोळ्यात साठवता आला नाही.जेजुरीची अर्थव्यवस्था खंडोबाला येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे.त्यामुळे एरवी सर्वजण भाविकांची वाट पाहतात.परंतु माऊलींच्या आगमनाच्या वेळी मात्र साऱ्यांचे डोळे पालखी सोहळ्याकडे लागतात.वारकऱ्यांची सेवा करण्यात सारी जेजुरी नगरी गुंतलेली असते.गेल्या तीन महिन्यापासून खंडोबा मंदिर बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे.भाविक बंद असल्याने अर्थव्यवस्था कोलमडली असून खंडोबाचे दर्शन बंदच आहे आणि आज माउलींचेही दर्शन घेता आले नाही.माउली आपल्या गावात आले नाहीत याची रुखरुख सर्वत्र जाणवली.

वारीत चालून पाय किती थकले असली तरीसुद्धा हजारो वारकरी खंडोबा गडावर जाऊन दर्शन घेतात यावेळी गडावर महिला वारकरी फेर धरून पारंपारिक गाणी गातात,फुगड्या खेळतात,विठुरायाच्या बुक्का व खंडोबाचा भंडारा एकमेंकींना लावतात.यावर्षी जेजुरीत खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन आलेला एकही वारकरी पाहायला मिळाला नाही की टाळ-मृदुंगाचा आवाज नाही.माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माऊलींचा पालखी सोहळा न आल्याने दर्शन घडले नाही असे ९६ वर्षाचे लक्ष्मण खाडे गुरुजी यांनी सांगितले.

admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

3 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

3 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

4 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

5 months ago

This website uses cookies.