विधायक

जागतिक पर्यावरणदिनी लोकसहभागातून वाघोली टेकडीवर वृक्षारोपण…

जागतिक पर्यावरणदिनी लोकसहभागातून वाघोली टेकडीवर वृक्षारोपण…
● ओसाड टेकड्यांवरही लोकसहभागातून वृक्षारोपण करुन वनराई उभी करावी : मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल
● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या श्वासाची तरतूद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी : वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे

महाबुलेटीन न्यूज । प्रसन्नकुमार देवकर
पुणे, दि. ७ जून : वनविभाग व ग्रीन सनसाईज हिल्स या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरणदिनी वाघोली टेकडीवर वड, पिंपळ, चिंच, आवळा आदी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी आर. जी. पुजारी यांनी दिली.

यावेळी मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, विभागीय वन अधिकारी बाळकृष्ण पोळ, ग्रीन सनराईज हिल्सचे अध्यक्ष चंद्रकांत नाकतोडे तसेच वन विभागाचे कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल म्हणाले, “काही वर्षापूर्वी ओसाड अवस्थेत असलेली वाघोली टेकडी आज हिरवीगार झाली असल्याची बाब अत्यंत सुखावह आहे. या टेकडीप्रमाणेच लगतच्या ओसाड टेकड्यांवरही लोकसहभागातून वृक्षारोपण करुन वनराई उभी करावी.”

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित करुन उद्याच्या श्वासाची तरतूद आपणासच करावी लागेल व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी”, असे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी यावेळी सांगितले. 
00000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

1 day ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

4 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

6 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.