इंदापूर : शहरातील कसबा भागात ३५ वर्षाचा इसम कोरोनाग्रस्त आढळल्याचे आज ( दि.७ जुलै ) निष्पन्न झाले आहे. अशक्तपणा जाणवू लागल्याने तीन दिवसांपूर्वी या इसमाने स्वतःहून आरोग्य तपासणी करुन घेतली होती. चाचणीसाठी स्वॅबचा नमुना पाठवण्यात आला होता. त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.