पुणे जिल्हा

एच.आय.व्ही. सहजीवन जगणारी मुले व पालकांनी सांता क्लॉज सोबत लुटला नाताळचा आनंद

 

सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करून सरत्या वर्षाला निरोप देत व नवीन वर्षाचे केले स्वागत

महाबुलेटीन न्यूज
चाकण : महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन, चाकण ता. खेड यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ पासून संपूर्ण खेड तालुक्यात एच.आय.व्ही/एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात असून त्याचाच एक भाग म्हणून क्रिसमस (नाताळ) सणाचे औचित्य साधून व नवीन वर्ष २०२१ चे स्वागत करण्यासाठी “क्रिसमस व नवीन वर्षे स्वागत” कार्यक्रम यश फौंडेशन कार्यालय,  चाकण या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रणजीत पाटील, सनी लोपेझ (अधिकारी वर्ग – महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि.) व श्री.रवींद्र पाटील (अध्यक्ष यश फौंडेशन) उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरवात सांता क्लॉजने मुलांना चॉकलेट व गिफ्टचे वाटप करून करण्यात आली.

नव वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देशातील व्यक्ती नवीन वर्षात नवनवीन संकल्पना, नवीन अशा, आकांक्षा आणि सुखमय आयुष्य जगण्यासाठी सगळेच जण संकल्प करत असतात. नवी दिशा, नवी स्वप्न , नवी क्षितिजे यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने आपण सारेच करीत असतो, परंतु असाही एक घटक आहे की, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देत देत त्यांना वर्ष देखील अपुरे पडते आणि सुखांच्या क्षणांनी दुःख विसरायला होते. आयुष्यातील समस्यांना तोंड देता देता या बालगोपाळांचे वर्ष सरत जाते, समाजात मिसळण्यासाठी पडणाऱ्या मर्यादा आणि आयुष्य जगण्यासाठी सुरू असणारी धडपड यामध्ये क्षणिक सुखही त्यांच्या वाट्याला फारसे येत नाही.

म्हणूनच समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रमाणेच या मुलांच्याही आयुष्यात काही आनंदाचे क्षण यावेत आणि अशा परिस्थितीत नववर्ष स्वागताच्या निमित्ताने त्यांच्या चेहऱ्यावर ती एक हास्य फुलावे आणि त्यांचा प्रत्येक क्षण हा आनंदात जावा या उद्देशाला साध्य करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

श्री. रणजीत पाटील यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना नवीन वर्ष व क्रिसमसच्या शुभेच्छा देल्या. तसेच कोरोनाच्या या काळात स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री. सनी लोपेझ यांनी आपल्या मनोगतात एच.आय.व्ही. बद्दल भिती न बाळगता सकारात्मक आयुष्य जगावे, असे प्रतिपादन करून त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास चाकण, खेड व मंचर मधील १४० एच. आय.व्ही सह जीवन जगणारी बालक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. क्रिसमस व नवीन वर्षाच्या निमित्ताने मुलांच्या हस्ते केक कापून कार्यक्रम साजरा करण्यात आला. या बाळगोपाळांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, पोषण आहार, चॉकलेट, बिस्कीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये सांताक्लॉजची वेशभूषा करून सांताने चॉकलेट विविध भेटवस्तू मुलांना देऊन मुलांसोबत नववर्षाचे हसत हसत स्वागत केले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

7 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 day ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.