महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या
दिनदर्शिकेचे प्रकाशन भारतीय किसान किसान संघाचे अनंत चंद्रचूड, ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले. पतसंस्था कार्यालयात दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक, माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे, सचिव कैलास भेगडे, तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे, कवी विठ्ठल दळवी, माजी अध्यक्ष राजेश सरोदे, सुधाकर देशमुख, ओमप्रकाश (राजू) राठी, राजाराम ढमढेरे, शाखा व्यवस्थापक दत्तात्रय कांदळकर आदी उपस्थित होते.
पतसंस्थेचे सभासद विठ्ठल दळवी यांना लोकसेवा महासंघाचा ‘लोकसेवा कविभूषण’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, श्यामची आई पुस्तक देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
अनंत चंद्रचूड म्हणाले, रवींद्रनाथ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्था स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मिळणे ही बाब पतसंस्थेच्या दृष्टीने गौरवाची आहे.
काकासाहेब काळे म्हणाले, पतसंस्थेचा कारभार पारदर्शी
आहे. टीमवर्क उत्तम आहे. वैकुंठरथ सारखे समाजाभिमुख उपक्रम राबवून पतसंस्थेने तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
रवींद्रनाथ दाभाडे म्हणाले, सभासदांचे हीत जोपासणे आणि त्यांची आर्थिक पत उंचावणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनच्या परिस्थितीतही सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात आला आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून पतसंस्था समाजहीत जोपासत असून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.
विठ्ठल दळवी म्हणाले, पुरस्काराने अधिक काम करण्याची
प्रेरणा मिळते. आई वडिलांचे संस्कार आणि थोरामोठ्यांचे
आशीर्वाद यामुळे आजपर्यंत मला जिल्हा आणि राज्यस्तरीय १३ पुरस्कार मिळाले असून राष्ट्रीय श्रमशक्ती फिनिक्स अवार्ड २०२१ जाहीर झाला आहे. पतसंस्थेने केलेला माझा सत्कार हा घरातील सत्कार असून अन्य पुरस्कारांपेक्षा तो मला मोठा आहे. कैलास भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. तर राजेश सरोदे यांनी आभार मानले.
—
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.