महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
वाडा ( पुणे ) : उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेकडे बिरसा क्रांती दलाचे महासचिव प्रमोद घोडाम, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दशरथ खाडे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले की, देशात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरु असतांना दुसरीकडे उत्तरप्रदेश राज्यात हाथरस, बलरामपूर या ठिकाणी मुलींवर बलात्कार होऊन त्या म्रुत्युमुखी पडल्या आहेत.
ही बाब अत्यंत दुर्दैवी असून देशाला कलंकित करणारी आहे. त्यामुळे या दोनही ठिकाणच्या घटनांचा बिरसा क्रांती दलाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात येत आहे. हाथरस व बलरामपूर येथील बलात्काराच्या घटना अक्षरशः अंगावर शहारे आणणा-या आहेत.
हाथरस येथील दलित समुहाच्या मुलीची जीभ कापून चौघांनी सामुहिक बलात्कार केला आहे, तर बलरामपूर येथील मुलीवर बलात्कार करुन पाय तोडून टाकले आहेत. या दोनही मुली ( मंगळवार दि. २९ सप्टेंबर ) एकाच दिवशी मरण पावल्या. बलात्काराच्या घटनेत दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या.
या मुलींना जलदगतीने न्याय मिळावा म्हणून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या दोघींच्या ही मारेक-यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
यापूर्वी सुद्धा उत्तर प्रदेशात दलित, आदिवासी समाजावर अन्याय, अत्याचार झालेले आहेत. देशात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करुन आणखी कठोर केलेला असतांनाही दिवसेंदिवस जातीय अत्याचार वाढत असून दलित व आदिवासी सुरक्षित नसल्याचे या घटना साक्ष देतात.
हाथरससह देशभरातील जातीय अत्याचारासंदर्भातील सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे व जलदगतीने न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.