पुणे जिल्हा

हाथरस घटनेचा आळंदी ग्रामस्थांच्या वतीने निषेध

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी, दि.०४ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका युवतीवर सामुहिक अत्याचार झाला, त्यात त्या पिडीत मुलीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण देश हळहळला. समाजमन सुन्न झाले, देशात वारंवार अशा घटना घडत आहे त्यामुळे असे कृत्य करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व या प्रकरणातील आरोपींचा निषेध करत आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवले जावे, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी केली आहे.

हाथरस प्रकरणाचा निषेध म्हणून तसेच पिडीत युवतीला सामुहिक आदरांजली वाहण्यासाठी आळंदी येथील महाद्वार चौकात आळंदी ग्रामस्थ एकत्र आले, यावेळी आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी विरोधी पक्षनेते डि. डि. भोसले पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माजी सरपंच सोमनाथ मुंगसे, माजी नगरसेवक मृदुल भोसले पाटील, आळंदी विकास युवा मंचचे संदीप नाईकरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, सतीष कुर्‍हाडे, प्रसाद बोराटे, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे (डिके), धनंजय घुंडरे, रमेश नवलाखा, ज्ञानेश्वर जा.कुऱ्हाडे, महेश गुळंजकर, सुवर्णा कुऱ्हाडे, स्मिता खडके उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक डि.डि.भोसले पाटील म्हणाले की, उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरुण खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी महाराष्ट्रातील भाजप का करत नाही.

संदीप नाईकरे पाटील म्हणाले, घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. गुन्हेगारांवर जलद कायदेशीर कारवाई करुण फासावर लटकवले जावे, अशी आमची मागणी आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.