राष्ट्रीय

हॅलो, साहेब बोलतायेत… शरद पवार यांच्या आवाजात सिल्व्हर ओक मधून आलेल्या बनावट कॉल मध्ये असा होता संवाद…

हॅलो, साहेब बोलतायेत…
शरद पवार यांच्या आवाजात सिल्व्हर ओक मधून आलेल्या बनावट कॉल मध्ये असा होता संवाद….

महाबुलेटीन न्यूज
चाकण : शरद पवार यांच्या आवाजात बनावट कॉल करून चाकण येथील उद्योजक प्रतापराव खांडेभराड यांना मारण्याची धमकी देऊन 5 कोटींची खंडणी उकळणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी प्रतापराव खांडेभराड यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन संपर्क साधला असता ते म्हणाले की, दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजून 21 मिनिटांनी एक कॉल आला. त्यावेळी माझ्या मोबाईल डिस्प्लेवर ‘शरद पवार साहेब सिल्व्हर ओक’ असे दिसून आल्याने मी तो कॉल सिल्व्हर ओक चाच समजून रिसिव्ह केला, आणि संभाषण केले.

काय होते ते संभाषण पहा :- ( पहिला कॉल ) :-

शरद पवार साहेबांचा पी ए बनलेली बनावट व्यक्ती ( यापुढे लिहिताना फक्त पीए उल्लेख केला आहे ) : हॅलो, हॅलो, हॅलो…हा साहेब बोलतायत, एक मिनिट
शरद पवार साहेबांच्या आवाजात बोलणारी बनावट व्यक्ती ( यापुढे लिहिताना पवार साहेब असा उल्लेख केला आहे ) : खांडेभराड…
प्रतापराव खांडेभराड ( यापुढे लिहिताना पीके असा उल्लेख केला आहे ) : हां साहेब नमस्कार, साहेब नमस्ते, हॅलो…
● पवार साहेब : धीरज पठारेचं काय प्रकरण हे?
● पीके : धीरज पठारे, त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि पैसे देण्याऐवजी जमीन नावावर करून दिली. मी त्याला 13 एकर जमीन नावावर करून दिलेली आहे. आणि आता कोरोनामुळे त्याला गिऱ्हाईक नाही, म्हणून ते माझ्या मागे लागलेत की, मला पैसे द्या, अन तुमची जागा परत घ्या..अन मी क्लिअर कट.. हॅलो…
● पवार साहेब : हा ऐकतोय मी,
● पीके : तर ती क्लिअर कट खरेदीखत करून दिले ते.. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य म्हणून तुम्ही तुमची विका किंवा काहीही करा…
● पवार साहेब : ठीक हे, त्यांचं काय असेल, ते लवकरात लवकर मिटवून टाक ते…बरं दिसत नाही आपल्याला.
● पीके : बरोबर हे, पण ते मिटायला पैशाची अडचण हे
● पवार साहेब : त्यांचं काय असंल ते मिटवून टाक.
● पीके : साहेब, ते खरेदीखत करूनच ते सगळं केलंय.
● पवार साहेब : त्यांचं काय असन ते मिटवून टाक, अन डोक्याला ताप नको…कानावर नको नको ते ऐकायला येतंय… मिटवून टाक ते.
● पीके : चालन, पण ते मिटवलेला आहे त्यांचा व्यवहार, पण आता ते डबल परत मागतात, ते नाय मागितले पाहिजे त्यांनी.
● पवार साहेब : ठीक हे..
( पहिला कॉल संपला )
———————————————————-
प्रतापराव खांडेभराड यांना दुसऱ्यांदा केलेल्या कॉल मधील संभाषण :-
● पीके : हॅलो, हॅलो, हॅलो, हं…
● पीए : पठारेंशी बोलून घ्या, साहेबांनी सांगितलंय पठारेंशी बोलून घ्या, काय असल ते…
● पीके : हा चालन, मी साहेबांकडे माझ्याकडे काय आहे अडचणी त्या, कसं दिलंय, काय दिलंय? मी सांगायला येतो. कारण मी सांगितल्याशिवाय ते लक्षात यायचं नाय. कारण माझ्यावर इतका अन्याय आणि बळजबरी झाली आहे की, त्याची सगळी मापं ओलांडली गेलीयेत. आणि तरी मी ते सगळं खरेदीखताने देऊन टाकलंय… हॅलो
● पीए : ऐका ना, ऐका ना..त्यांचं काय असल…साहेबांनी सांगितलंय म्हणल्यानंतर ते मिटवून टाका, काय विषय नाय म्हंजे..
● पीके : अहो मी ते सगळं खरेदीखताने देऊन टाकलंय.
● पीए : ऐका ना..
● पीके : हॅलो..
● पीए : ऐका ना, ऐका ना..त्यांचं काय असल ना, तो विषय साहेबांनी सांगितलाय तर मिटवून टाका.. काय विषय नाय म्हंजे..
● पीके : अहो ते मी खरेदीखत…
● पीए : यायची गरज नाय सायबांपर्यंत..
● पीके : अहो, मी खरेदीखताने तो व्यवहार मिटवलाय ना, खरी त्यांच्या नावावर जमीन हे ती, त्यांच्या नावावर..
● पीए : अहो त्यांनी सांगितलंय, काय ते पेमेंटचा काय विषय हे?
● पीके : अहो पण..
● पीए : पेमेंटचं सायबांनी सांगितलंय, तो विषय क्लिअर करून टाका… हॅलो..
● पीके : करून टाकायचं झालं पण मी मिटवलेला हेना तो.. हॅलो
● पीए : एक मिनिटं.. साहेब ते म्हणत्यात तो मिटवलेला आहे. एक मिनिट, एक मिनिट..साहेब बोलत्यात…
● पवार साहेब : अरे…
● पीके : साहेब माझी विनंती आहे..हॅलो..माझी विनंती आहे. मी परिस्थिती तुमच्यापुढं येऊन सांगतो. म्हंजे तुमच्या लक्षात येईल. ती एकतर्फी सांगत्यात असं मला वाटायला लागलंय.
● पवार साहेब : एकतर्फीचा विषय नाय..मी तुमचं बी ऐकून घेतोय, त्यांच्याकडून पण ऐकलंय. मला वाटतं हा विषय संपवून टाकलेला बरा असं वाटतंय.
● पीके : साहेब, माझी इच्छा संपवायचीच होती, म्हणून मी ती खरेदीखताने संपवलंय. मधे एकदा ते मध्यस्थ करून बोलले, तर मी बोललो..तुला दिलेलं आहे, ते नावावर करून दे, ते विकतो दुसरं कुणाला, अन मग तुला देतो. पण जमीनही त्याच्याच नावावर, अन पैसे पण मागतोय, ते दोन-दोन वेळा होतंय.
● पीके : साहेब ते आले माझ्याकडं तर बोलतो त्यांच्याशी..
● पवार साहेब : तक्रारी करताय, पोलीस केस करताय..
( येथील संवाद वगळला आहे, या संवादात पठारे यांनी मारण्याची धमकी दिल्याचे पीके यांनी सांगितले आहे.)
● पवार साहेब : ठीक हे..काय ते मिटवून टाक…
( दुसरा कॉल संपला )
————————————————————-

पवार साहेबांचा आवाज आणि एकतर्फी बोलण्यामुळेच शंका वाढली : प्रतापराव खांडेभराड 
यासंदर्भात प्रतापराव खांडेभराड यांनी सांगितले की, “मला कॉल मधील पवार साहेबांचा आवाज व एकतर्फी सांगण्यावरून फोन कॉलच्या सत्यतेविषयी शंका आली. खरेतर कॉल चालू असतानाच मला शंका येत होती. पण मी कॉल रिसिव्ह करताना माझे मोबाईल डिस्प्लेवर ‘sharad pawar saheb silver oak’ पाहिले होते. त्यामुळे मी आदरणीय शरद पवार साहेब समजूनच बोलत होतो. पण शंका आल्याने कॉल संपल्यावर मी माझे ट्रू कॉलर चेक केले असता सिल्व्हर ओक चाच फोन असल्याची खात्री झाली. पण कॉल विषयी पक्की शंका आल्याने मी तात्काळ पवार साहेबांचे पीएस सतीश राऊत साहेबांशी संपर्क साधला. तेंव्हा साहेब मुंबईमध्ये नसून दिल्लीला असल्याचे समजले. तेंव्हा आलेला फोन कॉल पवार साहेबांचा नसून बनावट ( फेक ) असल्याचे माझ्या लक्षात आले.
——————————–

 

 

     बनावट कॉल प्रयोग अफलातून; पण ठिकाण चुकलं…: प्रतापराव खांडेभराड
माझ्या शालेय जीवनापासूनच पवार साहेब व त्यांचा आवाज माझ्यात पक्का भिनलाय. त्यामुळे मला साहेबांच्या आवाजातील फरक समजायला वेळ लागला नाही. त्यामुळेच संभाषण संपताच मी कॉलची सत्यता पडताळून पाहिली असता आलेले दोन्ही कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
——————————-

MahaBulletin Team

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

4 days ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

2 weeks ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

3 weeks ago

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…

4 weeks ago

दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…

4 weeks ago

This website uses cookies.