विधायक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना मदत

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍याहस्‍ते ज्‍येष्‍ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना 1 लाख रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्‍यात आले. पुण्‍यात त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गृहमंत्री देशमुख म्‍हणाले, “आजी या वयातही परिवार चालविण्‍यासाठी काम करतात. त्‍यांना शासकीय योजनेतून योग्‍य ती मदत दिली जाईल”. पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्‍या ‘भरोसा सेल’ मार्फत ज्‍येष्‍ठ नागरिकांना मदत केली जाते. आतापर्यंत 15 हजारांहून अधिक ज्‍येष्‍ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्‍यात आली आहे. पोलीस विभागामार्फत अधिकाधिक मदत देण्‍याचाही प्रयत्‍न केला जाणार असल्‍याचे सांगून जिल्‍ह्यातील गणेशोत्‍सव तसेच बकरी ईदच्‍या पार्श्‍वभूमीवर पोलीस विभागाचा आढावा घेतल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्‍यसंपन्‍न असल्‍याचे दाखवून दिले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 16 Nov 2026

शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मतदार…

24 hours ago

MahaBulletin — 14 Nov 2026

शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 12 Nov 2026

बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 10 Nov 2026

सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मर्सिडीज-बेंझ…

7 days ago

MahaBulletin — 09 Nov 2026

रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 08 Nov 2026

शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

1 week ago

This website uses cookies.