महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
घोटावडे : येथील भाजपाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र देवकर यांच्या दोन्ही मुली वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्या आहेत.
रामचंद्र देवकर हे गेली अनेक वर्ष घोटावडे परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. मध्यतरीच्या काळात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांची पत्नी शिवकन्या देवकर यांनी शिवसेनेकडून तर रामचंद्र देवकर यांनी भाजपाकडून पंचायत समितीची निवडणूकही लढविली होती. माञ दोन्ही ठिकाणी वेळी त्यांचा पराभव झाला. जनमानसातून निवडून येण्याचे त्यांचे स्वतःचे स्वप्नही अनेक वेळा अपूर्ण राहिले.
रामचंद्र देवकर यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यातून अनेक गरीबांचे प्रपंच उभे केले. कातकरी आदिवासी समाज, विटभट्टीवर काम करणारे, ऊस तोडणी कामगार, बेसहारा महिला वर्ग यांना रामचंद्र देवकर यांनी सढळ हाथाने मदत केली. माञ निवडणूकीत त्यांना यश मिळाले नाही. माञ सोमवार ( दि.१८) रोजी झालेल्या मतमोजणीवेळी रामचंद्र देवकर यांच्या कन्या सोनाली मातेरे या घोटावडे ग्रामपंचायतीत तर मोनाली सागर ढोरे या पौड ग्रामपंचायतीत निवडून आल्या.
मतमोजणी वेळी विजयी घोषित झाल्यानंतर सोनाली यांना आपले अश्रू आवरता आले नाही. तर मोनाली या सुध्दा पती सागर ढोरे यांचा मागिलवेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढत निवडून आल्या. शिवकन्या व रामचंद्र देवकर यांचे निवडून येण्याचे स्वप्न त्यांच्या दोन्ही मुलींनी पूर्ण केले आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.